नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने आज लखनौमध्ये त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कमाल खान आपल्या रिपोर्टिंगच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते एनडीटीव्हीचे लखनौ (उत्तरप्रदेश) प्रतिनिधी होते. 1960 साली जन्मलेल्या कमाल खान यांनी केलेली अनेक वार्तांकनं चर्चेत राहिली. आपल्या जवळपास तीन दशकाच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. भाषेवर त्यांचे खूप चांगले प्रभूत्व होते.
Terribly sad news to report this morning. Kamal Khan, NDTV’s fine reporter from Lucknow and a dear dear friend passed away this morning. I will miss you dearly my friend and our long chats. Lots of memories! Devastated. Om shanti🙏🙏 pic.twitter.com/TAnFbuwqf4
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) January 14, 2022
उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी कमाल खान यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मायावतींनी म्हटले आहे की, एनडीटीव्हीचे प्रतिष्ठित आणि नावाजलेले पत्रकार कमाल खान यांचे अचानक निधन झाले.
एनडीटीवी से जुड़े प्रतिष्ठित व जाने-माने टीवी पत्रकार कमाल ख़ान की अचानक ही निधन के ख़बर अति-दुःखद तथा पत्रकारिता जगत की अपूर्णीय क्षति। उनके परिवार व उनके सभी चाहने वालों के प्रति मेरी गहरी संवेदना। कुदरत सबको इस दुःख को सहन करने की शक्ति दे, ऐसी कुदरत से कामना।
— Mayawati (@Mayawati) January 14, 2022
ही अत्यंत दु:खद आण पत्रकारिता विश्वाची मोठी हानी आहे. त्यांच्या परिवार आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. मायावती यांच्यासह अनेक दिग्गजांनी कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.