ज्येष्ठ पत्रकार डी. के. वैद्य यांचे निधन
Updated On:

अकोले – ज्येष्ठ पत्रकार डी.के. वैद्य (वय 71, रा. कमानवेस, अकोले) यांचे सोमवारी (दि.14) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वैद्य हे दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी होते. तसेच माॅडर्न हायस्कूल ज्यूनिअर काॅलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि15) सकाळी 9 वाजता अकोले येथील प्रवरातीरी अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.





