नवी दिल्ली – मुळचे नागपूरचे असणारे भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे 28 ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत. हरीश साळवे यांचे वय 65 वर्ष आहे. साळवे यांनी मागील वर्षी पहिली पत्नी मीनाक्षी यांना घटस्फोट दिला आहे. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. साळवे आता त्यांची लंडनची मैत्रिण कैरोलिन ब्राॅसर्ड यांच्यासोबत विवाह करणार आहेत.
हरीश साळवे आणि होणारी पत्नी कैरोलिन या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. कैरोलिन या 56 वर्षांच्या असून त्यांना एक मुलगी देखील आहे. कैरोलिन या कलाकार आहेत. साळवे आणि कैरोलिन यांची भेट एका कला प्रदर्शनात झाली होती. त्यानंतर अनेकदा भेट होत गेली, मैत्री झाली, आणि आता त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक अशी ओळख असलेल्या हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने कुलभूषण जाधव यांचा खटला लढला होता. कोर्टात नुसतं एकदा हजर राहण्यासाठी हरिश साळवे चार ते पाच लाख रूपये घेतात असं बोललं जातं. असं असतानाही साळवेंनी पाकिस्तानविरोधात जाधव यांचा खटला लढण्यासाठी अवघा एक रूपया घेतला होता. त्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांचे कौतूक करण्यात आले होते.
तसेच हरिश साळवे यांनी टाटा, अंबानी, महिंद्रा यांसाख्या मोठ्या घराण्यांची देखील वकिली केली आहे.