कर्नाटकात भाजपकडून पाडापाडी – खरगे

बंगळुरू – कर्नाटकात भारतीय जनता पक्षाकडून आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आघाडीच्या आमदारांना प्रलोभने दाखवून फोडले जात आहे. त्यांना राज्याच्या बाहेर मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलात ठेवण्यात आले असून राज्यातील सरकार येनप्रकारे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आमच्यात फूट पाडण्यासाठी वृत्तपत्रांनाहीं खोटी माहिती मुद्दामहून पुरवली जात आहे असे ते म्हणाले. या देशात महंमद बिन तुघलक याच्यानंतर त्याच्यात मनोवृत्तीचा एक राजकारणी कार्यरत आहे त्याचे नाव नरेंद्र मोदी अशा शब्दात त्यांनी भाजप व मोदींवर शरसंधान साधले. आघाडीचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आपला हात नाहीं असे येडियुरप्पा यांनी एएनआय या संस्थेशी बोलताना सांगितले.

गेल्या वर्षभरापुर्वीच राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सुरूवातीपासून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असे खर्गे यांनी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.