चंदीगड/नवी दिल्ली – पंजाबातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन आज भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांनी आपले राजीनामा पत्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवले असून त्यात त्यांनी कॉंग्रेसने आपल्याला आजवर दिलेल्या संधींबद्दल आभारही मानले आहेत.
तथापि पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले जात आहे. पक्षाचा सध्याचा कारभार आणि संस्कृती पहाता मला यापुढे पक्षात राहण्यात स्वारस्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
Helicopter Crash : युक्रेनमध्ये शाळेजवळ कोसळले हेलिकॉप्टर; गृहमंत्र्यासह 16 जणांचा मृत्यू
याआधीच्या कॉंग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केलेले बादल यांनी म्हटले आहे की, सात वर्षांपूर्वी मी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबचे कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केले होते. मी मोठ्या आशेने हे विलिनीकरण केले होते. तथापि सुरूवातीच्या उत्साहाच्या काळानंतर हळूहळू माझा भ्रमनिरास झाला असेही त्यांनी म्हटले आहे.