लंडन – इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि ज्येष्ठ समालोचक रॉबिन जॅकमॅन यांचे शुक्रवारी(25 डिसेंबर) निधन झाले. त्यांचे वयवर्षे 75 होते. इंग्लंडकडून ते चार कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळलेले आहे. भारतात हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे जन्मलेल्या जॅकमनने 1966 ते 1982 दरम्यान 399 प्रथम श्रेणी सामन्यांत 1402 बळी घेतले. निवृत्तीनंतर ते दक्षिण आफ्रिकेत समालोचक म्हणून काम करत होते.
रॉबिन जॅकमॅन यांनी आपल्या एकदिवसीय कारर्किदीत 15 सामने खेळत 54 धावा केल्या होत्या. गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी एकदिवसीय सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या. तर 4 कसोटी सामन्यात 14 बळी घेतले होते.
निवृत्तीनंतर त्यांनी समालोचक म्हणून चांगली प्रसिद्धी मिळविली होती. 2003च्या विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यातील त्यांची कॉमेंट्री खूपच गाजली होती. हा सामना भारताने जिंकला होता. या सामन्यात शोएबच्या गोलंदाजीवर खेचण्यात आलेल्या ऐतिहासिक षटकारावर जॅक यांनी केलेले भाष्य आजही सर्वांच्या मनात जिवंत आहे.
दरम्यान, ज्येष्ठ समालोचक आणि इंग्लंडचा माजी गोलंदाज रॉबिन जॅकमॅन यांच्या निधनाबद्दल जगभरातील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनीही शोक व्यक्त केला आहे.