पुणे – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 21 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, जीवनावश्यक वस्तू, औषधी त्यांना पर्यंत सहज पणे घरबसल्या मिळाव्यात या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) ज्येष्ठ नागरिक सहाय्य उपक्रम सुरू केला आहे.
“मनविसे’ चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरु केल्याने जेष्ठ नागरिकांची मोठी सोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना काही मदत लागण्यास त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. या उपक्रमासाठी वाघमी फाउंडेशनचे विशेष सहकार्य केले आहे. या सुविधाचा लाभ घेण्याचे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.
*कल्पेश यादव (विमान नगर-वडगावशेरी-गांधीनगर -म.हौ.बोर्ड) — 9623337777
*राजेंद्र राजपुरोहित (विश्रांतवाडी-टिंगरे नगर-धानोरी)— 8087642744
*राहुल मोहिते (येरवडा) – 8329407882
*दिपक राजपुरोहिक (प्रतिकनगर) — 9011114102
*निखील निंबाळकर (खराडी) — 9284440656
*सागर नगरे (टिंगरे नगर) — 8793311242
पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांना संचार बंदी काळात गावी जाणे शक्य नाही. त्यातच शहरात सर्व मेस बंद झाल्याने त्यांची जेवणाची अडचण होत आहे. अशा उमेदवारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आले आहे. गरजूंनी संपर्क साधावा, असेही यादव यांनी म्हटले आहे.