शिरूरः अण्णापूर ता. शिरुर येथील ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्या व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव (रा. अण्णपूर, ता. शिरूर, ज. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वसंत मल्हारी जाधव (वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार ,अन्नापूर ता. शिरुर येथील वसंत जाधव हे घरात असताना रात्रीच्या वेळी त्यांचा पुतण्या रामदास उर्फ मुसाभाई हा दरवाजाला लाथ मारून घरात आला. त्यावेळी वसंत यांनी तू रात्रीचा घरात का आला असे म्हणत म्हणाले असता हे घर माझ्या नावावर करुन दे असे रामदास म्हणाला, त्यावेळी वसंत यांनी नकार दिला असता रामदास याने वसंत यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी शेजारील भाऊ गिरे यांनी वसंत यांना मारहाणीतून सोडवले. याबाबत वसंत मल्हारी जाधव (वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव (रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहे.
अण्णापूर गावात सन-२०१९/२० पासून ग्राम ठरावांसह गावातील अवैध दारु, ताडी आणी गुटखा बंदीसाठी शासनस्तरावर आमचे पत्रव्यवहार सुरु आहेत. परंतु, या धंद्यांबाबत “पोलीस/राज्य उत्पादन शुल्क/अन्न औषध प्रशासनाने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन गाव तसेच तालुकास्तरीय या बाबींना पूर्णपणे लगाम लावणे आवश्यक आहे. अवैध दारू व संलग्न बाबींनाला पुर्णपणे आळा घालण्याबाबत शासनाने अनेक शासन निर्णय/शासन परिपत्रके आदेश निर्गमित केलेले आहेत. मात्र, दुर्दैवाने या आदेशांचे योग्य पालन होत नसल्यामुळे या अवैध व्यावसायिकांना आणि समाजकंटकांना कायद्याचे भय राहिलेले नाही.
शासनाने निर्गमित केलेल्या शासन आदेशांनुसार “अवैध दारू धंद्यांबाबत पोलीस ठाण्याचे ठाणेदार व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक/उपनिरीक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेेच तीन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या इसमानवर पोलीस अधिनियमाद्वारे हद्दपारची तसेच एमपीडीएची कारवाई करण्याबाबतही शासनाच्या सूचना आहेत. ज्या हॉटेलमध्ये किंवा दुकानांमध्ये अवैधपणे दारूमध्ये विक्री होत असेल त्या गुत्ता मालकावरही गुन्हा नोंद करून संबंधित हाॅटेलचा परवाना कायमचा करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. ढीगभर शासन आदेश आहेत, परंतु योग्य अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा काय उपयोग?
निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते)