मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ “दिलीप कुमार’ (Dilip Kumar) यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे दिलीप कुमार यांच्या चित्रपटांप्रमाणे मधुबालावरील त्यांच्या निर्वाज्य प्रेमाची कहाणी काय होती? हे सुद्धा तितकीच चर्चेत आली होती.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम ही बॉलिवूडमधील अख्यायिका बनून राहिली आहे. अगदी आजच्या पिढीतही मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमावर भरभरून बोललं जातं. दिलीप कुमार-मधुबाला यांच्या प्रेमाची कहाणी 1951पासून सुरू झाली. मात्र, या प्रेमात मिठाचा खडा पडला. मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांच्या एन्ट्रीमुळे दोघांना भेटणं मुश्किल झालं.
पुढे दिलीप कुमार आणि मधुबाला आपल्या नजरेच्या बाहेर राहू नये म्हणून त्यांनी त्यांचा चित्रपटांच्या भूमिकांमध्ये दाखल देण्यास सुरुवात केली. तसेच ऐकत्र काम करण्यास विरोध केल्याचं सांगितलं जात होतं.
त्यामुळे येत्या काळातील चित्रपटामधील भूमिकेत दिगदर्शक बीआर चोपडा यांनी आपल्या चित्रपटामध्ये मधुबाला यांच्या जागी वैजंयतीमाला यांना घेतलं. चोपडा यांनी नया दौर चित्रपटाच्या जाहिरातीत मधुबालाच्या फोटोवर काट मारलेला फोटो त्यांनी वर्तमान पत्रात छापला. त्यामुळे खान भडकले. त्यांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची यादी तयार केली आणि नया दौर सिनेमावर काट मारून ही यादी छापली. त्यामुळे चोपडाही भडकले आणि हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा ‘योर ओनर मैं इस औरत से प्यार करता हूं और आखिरी दम तक करता रहूंगा’ असं दिलीप कुमार यांनी निक्षून सांगितलं. कोर्टात मधुबालावरील निर्व्याज्य प्रेमाची जाहीर कबुल देणाऱ्या दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या संबंधात मात्र पुढे कटुता आली.