नवी दिल्ली – उन्नाव येथे सन 2017 साली झालेल्या बलात्कार प्रकरणात भाजपचा बडतर्फ आमदार कुलदीप सेनगर याच्या विरोधात आज येथील कोर्टात आरोप निश्चीती करण्यात आली. जिल्हा न्यायाधिश धर्मेश शर्मा यांनी सेनगरचा साथीदार शशी सिंग याच्यावरही आरोपपत्र निश्चीत केले आहे.
120 बी, 363, 366, आणि बलात्काराच्या कलम 376 अन्वये त्यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले आहेत. सेनगर आणि त्याच्या भावाने या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याचा स्वतंत्र गुन्हाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणात तीन पोलिस कर्मचारीही सामील होते. त्यांच्यावरही हा खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व सेनगर याच्या भावाने केलेल्या बेदम मारहाणीत सदर मुलीचे वडिल मरण पावले आहेत.