चारित्र्यशील उमेदवारालाच लोकशाहीच्या मंदिरात पाठवा – अण्णा हजारे

सुपा: पारनेर तालुक्‍यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेऊन पारनेर तालुक्‍यात आदर्श उपक्रम राबवून लोकशाहीला बळकट करण्यासाठी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, अपमान पचवायची शक्ती, जीवनात त्याग व राष्ट्र व समाजाचं हित समोर ठेवून समाजासाठी निस्वार्थ सेवा करणारा चारित्र्यशील उमेदवारालाच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पाठवण्यासाठी गावोगावी जावून मतदार जनजागृती अभियान अधिक प्रमाणात राबवून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचा संकल्प तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी केला व आण्णासाहेब हजारेंनी कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धिमध्ये लोकसभेच्या पार्श्‍वभूमिवर मार्गदर्शन केले.

यावेळी अण्णा म्हणाले, पक्षांमुळे लोकशाहीचे मोठे नुकसान होऊन समाजामध्ये गट तट होऊन लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय पक्ष, पार्ट्यांचा घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे जो उमेदवार लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये पाठविण्यासाठी मतदान यंत्रावरिल चारित्र्यशील उमेदवाराचा फोटो पाहुनच मतदारांनी मतदान करावे. लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर मतदार मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून मोठी जनजागृती करुन, एक आदर्श व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यासाठी पारनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी अण्णांच्या आंदोलनामुळेच आज सर्वसामान्य मतदाराला उमेदवाराचा फोटो पाहुन मशिनवर मतदान करता येणार, त्या यशाचे अण्णांच्या कार्याचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

अण्णांनी कार्यकर्त्यांना सांगितले, जो उमेदवार एक गाव आदर्श करुन निवडणुकीला उभा राहील, त्याच्या पाठिशी मतदारांनी रहावे. अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जागरुक मतदार हाच खरा लोकशाहीचा आधार या संकल्पनेनुसार तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी तालुक्‍यातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर, दत्ता आवारी, संदीप पठारे, सहदेव घनवट, मनोज तामखडे, गणेश चत्तर, शरद पवळेंनी तालुक्‍यात नियोजन बैठक घेऊन नियोजित आदर्श उपक्रम राबवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात आण्णांचे मार्गदर्शन घेवून केल्याची माहिती पवळे व खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.