मुंबई – ‘तू ठाकरे है तो मे भी राणा हू, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच, त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे.’ अशा शब्दांमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
यावर आताशिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’काय संबंध आपला हनुमान चालीसाशी? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त, असे घाडी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या,’नवनीत राणा जरा तोंड सांभाळून… कोण आहात आपण? सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री… एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचूप्रवेश झाला.’ असा टोलाही त्यांनी लागवला आहे.