वारजेत तीन गावठी पिस्तूलांसह सराईत जेरबंद

पुणे – वारजे परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख रूपयांचे तीन गावठी पिस्तूूल आणि दहा काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. निळकंठ सूर्यकांत राउत (वय 34, रा. भैरवनाथ हाउसिंग सोसायटी, रूपीनगर, निगडी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वारजे पोलीस ठाण्यात आर्म अॅॅक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजेतील बाह्यवळण मार्गावरील हॉटेल आम्रपाली येथे एक व्यक्‍ती गावठी पिस्तूूल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक आशीष बोटके यांना खबऱ्याकडून मिळाली. याबाबत पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस फौजदार जगन्नाथ गोरे, पोलीस नाईक मॅगी जाधव, अमोल काटकर, अरूण किटे, विजय कांबळे, नितीन जगदाळे, तेजस पवार, संदीप शेळके, सचिन धोत्रे यांच्या पथकाने वारजेतील हॉटेल आम्रपालीजवळ सापळा लावला. यावेळी तेथे आलेल्या निळकंठ राऊत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यामध्ये तीन गावठी पिस्तूूल आणि दहा काडतुसे असा ऐवज सापडला. त्याची किंमत 1 लाख 6 हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, राऊतने इतके हे पिस्तूल कोठून आणले आहेत. तसेच तो वारजेमध्ये कोणास विक्री करणार होता, याचा पोलीस तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)