बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात अनोख्या व्यक्तिरेखा साकारताना दिसते. तिचा “थप्पड’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने अभिनेता हृतिक रोशनबाबत आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले.
हृतिक रोशन हा तापसीचा सर्वात आवडता अभिनेता आहे. तिला त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदाच दोघांची भेट झाली होती. परंतु त्यावेळी तिला हृतिकसोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाली नाही. मात्र येत्या काळात ती हृतिकसोबत सेल्फी मिळवणार आहे.
शिवाय त्याच्या चित्रपटात काम देण्याची विनंती देखील करणार आहे. अशा शब्दात तापसीने हृतिकची स्तुती करत असताना आपल्या आगामी प्रकल्पाची माहिती दिली. दरम्यान, अनुभव सिन्हा यांचा “थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही लोकांनी त्याला विरोध दर्शविला होता. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.