कराड – पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाचा सोमवार दि. 28 रोजी समारोप झाला. सोमवारी प्रदर्शनात भाजीपाला स्पर्धा व शेळी, मेंढी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाला स्पर्धेत अडीच फुट लांबीचा दुधी भोपळा व चेरी टोमॅटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर कापिलच्या भाऊसाहेब ढेबे यांच्या 100 किलो वजनाच्या तोतापुरी जातीचा बोकड आकर्षन ठरला.
शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने प्रतिवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 24 ते 28 नाहेंबर दरम्यान स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. सध्या बाजार समितीवर प्रशासक असल्याने यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. पाच दिवसांच्या काळात प्रदर्शनातील स्टॉलच्या माध्यमातून कोठयावधी रूपयांची उलाढाल करण्यात आली. लम्पी आजारामुळे यावर्षी पशु पक्षी व जनावरांचे प्रदर्शन व स्पर्ध रद्द करण्यात आल्या होत्या. तरीही रविवारी श्वान प्रदर्शन व सोमवारी शेळी, मेंढी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कापिल येथील भाऊसाहेब ढेबे यांचा 100 किलो वाजनाचा तोतापुरी जातीचा बोकड व नागठाणे येथील नितीन मोहिते यांचा पंजाबी बिट्टल जातीला 75 किलो वाजनाचा बोकड प्रदर्शनाचे आकर्षन ठरले. तर भाजीपाला स्पर्धेत कोपर्डे हवीली येथील भरत चव्हाण यांचा अडीच फुट लाब दुधी भोपळा व भुंईंजचे अर्जुन ठोंबरे यांचे चेरी टोमॅटोने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. भाजीपाला स्पर्धेत वांगी, टोमॅटो, मिरची, काशिफळ, भोपळा, दोडका, काकडी, झुकेनी, चवळी, तोंडली, घोसावळे, तुर, रताळी, फ्लॉवर, नोथिंबीर, शेपू, चाकवत, मेथी, अळु, लालमाठ, शेवग्याची भाजी, तांदूळजा, पुदिना आदी. प्रकारच्या भाज्या सहभागी झाल्या होत्या. सोमवारपासून झालेल्या सर्व स्पर्धांचा पारितोषीक वितरण समारंभ करण्यात आला.