नगर: जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने हमाल पंचायतीचे माजी जिल्हाध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.12 जून रोजी राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते सकाळी 10 वा. हमाल पंचायत भवन, मार्केट यार्ड, नगर येथे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्रमिक हॉस्पिटल तसेच के. के. आय. बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही यावेळी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांना रु. 500 नाममात्र शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी मधुकर केकाण मो.9763621815, जालिंदर बोरुडे मो.9881810333, तबाजी कार्ले मो.9420343520 यांच्याशी संपर्क साधावा.