आपला पक्ष नेते का सोडत आहेत याविषयी आत्मपरिक्षण करा

गिरीश महाजन यांचे शरद पवार यांना उत्तर

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापत आहे. कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीत 50 पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. आपल्या पक्षातून लोक का जात आहेत याची आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे महाजनांनी प्रमुख शरद पवार यांना दिला आहे. केंद्रातील सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह करत असल्याचा आरोप पवारांनी नुकताच केला होता. त्यालाच आज गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वासच उरला नाही आता याचे भांडवल न करता त्याचे सरळ भाजपावर फोडले जात आहे. ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपवण्यासाठी केले जात आहेत असा आरोप महाजनांनी केला. तसेच आपल्या पक्षातून लोक का बाहेर पडत आहेत याचे आत्मपरिक्षण करावे असा सल्लादेखील महाजन यांनी दिला. तसेच आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतायेत का याकडे त्यांनी बघावे असे गिरीश महाजनांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)