स्वाभिमानी आक्रमक: कोल्हापूर, सांगलीत रोखली ऊस वाहतूक

कोल्हापूर (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील काल कोल्हापूरात झालेली बैठक फिस्कटल्या नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. संघटनेने कोल्हापुरात सुरू केलेलं हे आंदोलन आता सांगली पर्यंत जाऊन पोहोचल आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना सुरू असणारी ऊस वाहतूक रोखण्याचं आंदोलन आजही सुरू ठेवलं तर दुसरीकडे सांगलीतही ही या आंदोलनाची ची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील मुरगुड हुंन कागल कडे होणारी ऊस वाहतूक रोखली. यावेळी देखील तणाव निर्माण झाला अखेर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावं लागलं. जोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये ऊसदर जाहीर होत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करायची नाही असा निर्णय घेतला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली.

एक रक्कमी एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले आहे. पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखत, ट्रॅक्टरची हवा आंदोलकांनी सोडली.एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक कडेगाव येथील वांगी नजीकच्या चव्हाणवाडी व पलूस तालुक्यातील आंधळी फाटा येथून ऊस वाहतूक चालू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी समजली. त्यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोहोचत कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरत ट्रॅक्टरमधील हवा सोडून दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्व साखर कारखाने बंद आहेत. तसेच 23 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये पार पडणाऱ्या ऊस परिषदेमध्ये एफआरपीबाबत निर्णय होणार असल्याने, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ न देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एफआरपी ठरल्याशिवाय कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार, नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी आपल्या भागात पेट्रोलिंग सुरू ठेवल आहे

Leave A Reply

Your email address will not be published.