स्वयंघोषित ‘विद्वान’ मंत्री देशातील बुद्धिवंताना शिकवणार – राहुल गांधी 

नवी दिल्ली – स्वयंघोषित “विद्वान’ मंत्री देशातील बुद्धिवंताना आपले काम कसे करावे हे शिकवणार आहेत अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. पीएचडी साठीच्या विषयांवर निर्बंध घालण्याबद्दल राहुल गांधी यांनी प्रकाश जावडेकर यांना धारेवर धरले आहे.

पीएचडीसाठी राष्ट्रीय प्राथमिकता असलेल्या विषयांची मांडणी सूची (“a shelf of projects) करण्याबद्‌दल प्रकाश जावडेकर यांच्या खात्याने सर्व विभागांना आदेश दिला आहे. त्यावरून राहुल गांधी “अतिहुशार (over intelligent ) पंतप्रधानांचे स्वयंघोषित विद्वान मंत्री देशातील बुद्धिवंताना त्यांनी आपले काम कसे करावे हे सांगणार आहेत’ असे राहुल गांधी यांनी फेसबुकवर म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रकाश जावडेकर यांचा फोटो आणि केवळ राष्ट्रहिताच्या विषयांवर पीएचडी-केरळच्या प्राध्यापिकेचा राजीनामा (“HRD says PhDs only on ‘national priority’ topics, Kerala Prof quits”. ) असे शीर्षक असलेल्या वृत्तपत्राची वेब लिंक जोडली आहे.

या लेखानुसार केरळ मध्यवर्ती विद्यापीठातील इंग्रजी अभ्यास आणि तुलनात्मक साहित्य मंडळाची सदस्या असलेल्या मीना टी पिल्लाई यांनी मानव संसाधन विकास खात्याच्या आदेशाच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. सदर आदेश 13 तारखेला आल्याचे आणि सेंट्रल युनिव्हरसिटीजच्या व्हाईस चॅन्सेलर्सच्या डिसेंबरमधील बैठकीत असंबंधित विषयांवरील संशोधनाला आळा घालावा असे सांगण्यात आल्याचे लेखात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.