सेल्फ ड्रायव्हिंग मोटारी कृष्णवर्णीयांना अंधारात ओळखतच नाहीत!

लंडन – ब्रिटनमध्ये येत्या  पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सेल्फ  ड्रायव्हिंग मोटारी रस्त्यावर धावणार आहेत पण या मोटारींच्या तंत्रज्ञानाबाबत ब्रिटनच्या लॉ कमिशनने अनेक आक्षेप घेतले असून या तंत्रज्ञानाचा फेरविचार करावा अशी सूचना केली आहे.

सेल्फ ड्रायव्हिंग मोटारींच्या तंत्रज्ञानामध्ये मोटारी आपोआप चालतात मोटर चालवणाऱ्या चालकाला काहीच करावे लागत नाही. विविध प्रकारच्या सेन्सरचा वापर करून हे तंत्रज्ञान अमलात आणले जाते पण हे तंत्रज्ञान  परिपूर्ण नाही असे ब्रिटिश लॉ कमिशनने म्हंटले आहे. या मोटारी अंधारात कृष्णवर्णीय व्यक्तींना ओळखू शकत नाहीत तसेच महिला आणि लहान मुलांना बाबतही या तंत्रज्ञानामध्ये भेदभाव करण्यात आल्याचा आरोप लॉ कमिशनने केला आहे. 

ब्रिटनमध्ये 2035 पर्यंत रस्त्यावर धावणाऱ्या मोटारिंपैकी 40% मोटारी सेल्फ ड्रायव्हिंग मोटारी असणार आहेत याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी हे तंत्रज्ञान परिपूर्ण आणि भेदभाव मुक्त करावे अशी सूचना लॉ कमिशनने केली आहे या मोटारी रस्त्यावर आणण्यापूर्वी सर्व प्रकारच्या परिस्थितीचे आकलन या मोटारींना व्हावे यासाठी तंत्रज्ञानात योग्य बदल केला जावा असेही लॉ कमिशनने म्हटले आहे. 

स्त्यावर जाणवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीशी या ममोटारीने जुळवून घेतले तरच अपघातासारख्या घटना टळू शकतील असेही लॉ कमिशनने आपल्या अहवालात म्हटले आहे जर मानवी चुकी मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सेल्फ ड्रायव्हिंग मोटारी रस्त्यावर आणणार आणण्यात येणार असतील तर त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे पण चुकीच्या तंत्रज्ञानामुळे हे अपघातांचे प्रमाण अधिक वाढण्याचा धोकाही लॉ कमिशनने नजरेस आणून दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.