‘या’ टूलच्या आधारे करा कोरोनाच्या लक्षणांची स्व-चाचणी

कोरोना संकटकाळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल आणि टेलिमेडिसीन हेल्पलाईन बनवली आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो.

राज्यातील लाखो लोकांनी यांचा लाभ घेतला असून  या सर्व सुविधा अजुनही ऑनलाईन उपलब्ध असून कोरोनाचा प्रसार पाहता आवश्यकतेनुसार नागरिकांनी त्याचा वापर करावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या लक्षणांची स्व-चाचणी कशी कराल…

(1)महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत https://covid-19.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर नागरिकांसाठी स्वचाचणी (सेल्फ असेसमेंट टूल) साधन तयार केले आहे. तसेच हे टूल मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत उपलब्ध करून दिले आहे.

(2)कोरोनाची शक्यता वाटत असल्यास या टूलच्या आधारे नागरिक स्वत: प्राथमिक स्वरुपाची स्वचाचणी करु शकतात. कोरोनाबाधित असण्याची शक्यता घरबसल्या समजून घेऊ शकतात. त्वरित वैद्यकीय सल्ला आणि इतर संबंधित संपर्कांचा तपशील देखील या लिंकवर उपलब्ध आहे.

(3)तीव्र लक्षणे दर्शविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशासनालाही याचा उपयोग होतो. आतापर्यंत लाखो जणांनी याचा लाभ घेतला आहे. अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सहकार्याने हे टूल तयार केले आहे.

टेलिमेडिसिन हेल्पलाईन यासाठी वापरता येईल… 

  • कोविडविषयक माहिती आणि मदतीसाठी ९५१३६१५५५० ही टेलिमेडिसिन हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर फोन करुन नागरिक कोरोना संबंधित लक्षणांचे स्वत:चे स्क्रिनींग करु शकतात.
  • आयव्हीआर तंत्रज्ञानावर त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आवश्यकतेनुसार डॉक्टर त्यांना काही वेळात परत कॉल करू शकतात. ते कोरोनाबाधित व्यक्ती आहेत की इतर आजार आहेत याबाबत सल्ला देऊ शकतात.
  • पुढील कार्यवाहीसाठी उच्च धोक्याच्या व्यक्तींची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे देण्यात येते. ही हेल्पलाईन पीपीसीआर, व्यवसाय स्वयंसेवक गट, उद्योग आणि स्टार्टअपचे स्वयंसेवक आणि स्टेपवन यांच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.