मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे विशेष खबरदारीची गरज आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.
हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे.
दरम्यान, हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोरोनाविरोधात दोन हात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याचा जनतेला फायदा व्हावा, हा या टुल मागचा मुख्य हेतू आहे.