ओझर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुधीर गंगाधर देवणे आणि उपाध्यक्षपदी विशाल लक्ष्मण थोरवे यांची बिनविरोध निवड केली. ग्रामसभेत बाळासाहेब विधाटे यांनी तंटामुक्ती अध्यक्ष,उपाध्यक्षाच्या निवडीबाबतचा ठराव मांडला होता. त्यास उल्हास बोऱ्हाडे यांनी अनुमोदन दिले व उपस्थित सर्वांनी एकमुखाने ठरावाला मान्यता दिली.
तंटामुक्तीचे मावळते अध्यक्ष नितीन विधाटे यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार केला. यावेळी शिरोली बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच वैशाली थोरवे, गाव कामगार तलाठी प्रमोद इंगळे, ग्रामसेविका कल्पना दुराफे, निवृत्तिशेठ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश राऊत, पोलिस पाटील अमोल थोरवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरवे, प्रथमेश थोरवे, अनिता राऊत, अश्विनी शेरकर, सदस्य सुनंदा थोरवे,सुषमा उकिर्डे व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर देवणे यांनी तंटामुक्तीकडे प्राप्त झालेल्या अर्जाबाबत विचार विनिमय करून जेष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार ते गाव पातळीवर सोडवण्यासाठी अधिका अधिक प्रयत्न केले जातील असे सांगितले.