कटके, झुंजुरके यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

पुणे: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गादी विभागातून अभिजीत कटके व माती विभागातून तानाजी झुंजुरके यांची निवड झाली. पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहराची निवडचाचणी स्पर्धा येथे पार पडली.

याप्रसंगी तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, ऑलिंपिकवीर मारुती आडकर, आंतराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजी बुचडे, खजिनदार मधुकर फडतरे तसेच तालीम संघाचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, वस्ताद व कुस्तीशौकीन उपस्थित होते. सहसचिव गणेश दांगट, हेमेन्द्र किराड, अविनाश टकले, सदस्य जयसिंग पवार, योगेश पवार, रवी खालकर, पंच प्रमुख मोहन खोपडे, रवींद्र बोत्रे यांनी यशस्वी नियोजन केले.

पुणे शहरचा संघ -गादी विभाग -57 किलो संकेत ठाकुर, 61 किलो अनुदान चव्हाण, 65 किलो भालचंद्र कुंभार, 70 किलो सागर खोपडे, 74 किलो रवींद्र जगताप, 79 किलो अभिजीत भोईर, 86 किलो वैभव तांगडे, 92 किलो सागर मोहोळ, 97 किलो चेतन कंधारे, 86 ते 125 खुला गट अभिजीत कटके. माती विभाग – 57 किलो किरण शिंदे, 61 किलो निखिल कदम, 65 किलो सुरज कोकाटे, 70 किलो आकाश डुबे, 74 किलो अमर मते, 79 किलो व्यंकटेश बनकर, 86 किलो दिपक मोहिते, 92 किलो राजु तांगडे, 97 किलो तेजस वांजळे, 86 ते 125 खुला गट तानाजी झुंजुरके. कुस्तीगीरांची पुणे शहर संघात निवड करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.