कोपरगाव (प्रतिनिधी) -राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाली नुकताच जाहीर झाला. त्यात तालुक्यातील बहादराबाद येथील सागर मीनानाथ जोंधळे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.
जोंधळे यांनी यापूर्वी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात त्यांची विक्रीकर निरीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली होती. सध्या ते नाशिक येथील सहायक विक्रीकर आयुक्त वर्ग एक या पदावर कार्यरत आहेत. उपजिल्हाधिकारी होण्याची इच्छा असल्याने त्यांनी पुन्हा जिद्दीने अभ्यास करून परीक्षा दिली. त्यात त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.
जोंधळे यांची तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल तहसीलदार योगेश चंद्रे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, शिवसेना नेते नितीन औताडे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
जोंधळे यांचे माजी आमदार स्व. के. बी. रोहमारे कृषी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय सह. संस्था व के. डी. शिंदे सह. पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, रमेश रोहमारे, गोरख नवले, भाऊसाहेब औताडे, सुनील शिंदे, संदीप रोहमारे, राहुल रोहमारे, सोपान आभाळे, विठ्ठल जावळे, राजेंद्र औताडे यांनी सत्कार केला.