इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथील,पाच विद्यार्थ्यांनी नीट २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेच्या गुणाच्या आधारावर, एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये निवडी झाल्या आहेत.संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी या विद्यार्थ्यांचा अनोखा सन्मान संस्थेच्या वतीने केला.
संस्थेचे वय कमी असताना, देखील केवळ गुणवत्तेच्या जोरावर, ग्रामीण भागातील बळीराजाची मुले, वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी,एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी, गुणवत्तेने पुढे जात आहेत.याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी काढले. एमबीबीएस शिक्षणासाठी, रशियात पाच विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.यामध्ये अवधूत जयवंत ताटे हा नॉर्दन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी,तर राजवर्धन वसंतराव येवले प्रिव्ही लिस्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी,प्रणव गुलाब शिंदे तेवर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी व प्रतिक राजेंद्र लोहार नॉर्दन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी तर अमृता धनाजी मिसाळ नॉर्दन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया येथे अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.
या गुरुकुल संस्थेमध्ये बारावीची दुसरी बॅच बाहेर पडत असताना अनेक विद्यार्थी डॉक्टर होताना दिसत आहेत.त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांना रशियाला रवाना करताना संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ,मुख्य कार्यकारी संचालक भरत हरणावळ व मुख्याध्यापक विश्वास हुलगे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.