हडपसर, दि. 31 – येथील साधना सहकारी बॅंकेच्या कार्यलक्षी संचालकपदी भाऊ ज्ञानोबा तुपे व अशोक पंढरीनाथ घुले यांची निवड करण्यात आली आहे.साधना बॅंकेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी तसे निवडीचे पत्र दिले आहे.
भाऊ तुपे व अशोक घुले हे गेल्या 22 वर्षांपासून बॅंकेत विविध पदांवर कार्यरत आहेत. बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक ताकद देवून, बॅंकेच्या विविध योजना तळागाळात पोचविण्यासाठी काम करणार असल्याचे भाऊ तुपे व अशोक घुले यांनी यावेळी सांगितले.
बॅंकेचे अध्यक्ष सुरेश घुले म्हणाले, “करोना काळातही साधना बॅंकेने पगारवाढ करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. 28 शाखा व 1 विस्तारित कक्षात सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळातही सभासद व ग्राहकांना अखंड सेवा दिली. तसेच बॅंक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी सन 2004 पासून राबवित आहे. कर्मचाऱ्यांसाठी लाइफ इन्श्युरन्सही बॅंकेने स्वखर्चाने दिला आहे.
यावेळी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश घुले, उपाध्यक्ष रोहिणी तुपे, ज्येष्ठ संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते