ई-बस चार्जिंगसाठी 4 आगारांची निवड

पुणे – शहरात पीएमपीचा ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ई-बससाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी शहरातील विविध भागांतील 4 आगार निश्‍चित केले आहेत. तसेच, शहरात पुढील काही दिवसांत ई-बसची संख्या वाढणार असल्याने 250 वाहकांच्या भर्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शहरात ई-बस पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असल्याने प्रशासनाने 75 बस सुरू केल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 150 ई-बस केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. शहरात पीएमपीच्या ई-बस चार्जिंगसाठी भेकराईनगर व निगडी या 2 ठिकाणी चार्जिंगची सोय केली आहे. परंतु, ई-बसच्या वाढत्या संख्येमुळे चार्जिंग करण्यासाठी बाणेर, रावेत, कात्रज आणि मोशी या बसस्थानकावर सुविधा उपलब्ध करून देण्याची शक्‍यता आहे.

नव्या बस व पायाभूत सुविधेवर भर दिला जात आहे. तसेच, नव्याने ई-बस दाखल झाल्याने पीएमपीच्या ताफ्यातील 110 जुन्या बस स्क्रॅपमध्ये टाकण्यात आल्या आहेत. तसेच, काही ई-बस आरटीओ परवानगीच्या प्रक्रियेत असून पुढील काही दिवसांत त्या बसही दाखल होणार आहे.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here