पुणे – “बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स’ या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील यादीवर आक्षेप नोंदवण्याची रविवारी (दि.3) शेवटची संधी देण्यात आली आहे. तर, पाच जानेवारीला निवड यादी जाहीर होणार आहे; तसेच सहा जानेवारीला प्रवेशक्षमता प्रसिद्ध होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
राज्य सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 7 ते 10 जानेवारीदरम्यान कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन करायचे आहेत. निवड यादी 12 जानेवारीला प्रकाशित झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना 13 ते 19 जानेवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर याच कालावधीत कॉलेजला प्रत्यक्ष भेट देऊन शुल्क आणि कागदपत्रे जमा करायची आहेत.
दुसऱ्या फेरीसाठी 20 जानेवारीला प्रवेशक्षमता जाहीर होऊन 21 ते 23 कॉलेजांचे पर्याय निवडायचे आहे. त्यानंतर 25 जानेवारीला निवड जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना 26 ते 29 जानेवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहे. तर, 27 ते 29 जानेवारी या कालावधीत कॉलेजमध्ये प्रत्यक्ष शुल्क व कागदपत्रे जामा करून प्रवेश घ्यायचा आहे, असे राज्य सीईटी सेलने कळविले आहे.