राजगुरूनगर – जनरेटर, ट्रॅक्टरचा रोटावेटरची चोरी करणाऱ्या सराईत सहा गुन्हेगारांना खेड पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्याकडून 4 लाख 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरीसह पूर्वीचे चोरी केल्याच्या गुन्हाही उघड झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
सोहेल उर्फ अमरअली मळी (वय 21), ऋतिक उर्फ मसूऱ्या काशिनाथ मसुरे (वय 19), स्वप्निल चिमाजी तिरपाडे ( वय 19), अक्षय उर्फ बंटी रोहिदास वरे(वय 21), सागर काळू बुरुड (वय 21), ऋतिक काशिनाथ सुरकुले (वय 19 सर्व रा. भोसरी) असे बेड्या ठोकण्यात आलेल्यांची नावे आहेत आहेत.
पोलीस निरीक्षक सतीश गुरव म्हणाले की, शिरोली (ता. खेड) येथे रविवारी (दि. 8) रात्री भानुदास बबन पवळे यांनी शेताच्या कडेला ठेवलेला ट्रॅक्टरचा रोटावेटर चोरीला गेला होता. पवळे यांनी त्याच रात्री खेड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोरीच्या घटनास्थळा पासून काही अंतरावर एक संशयित टेम्पो पोलिसांना दिसून आला. त्याला अडवले असता टेम्पोतील तीन चार जणांनी उड्या मारून अंधाराचा फायदा घेत पलायन केले.चालक मात्र पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. टेम्पोची झडती घेतली असता मागे रोटावेटर दिसून आला. पोलिसांनी संशयित चालकाची कसून चौकशी केली असता सोहेल नाव सांगितले. टेम्पोत ठेवलेला रोटाव्हेटर शिरोली येथुन चोरी करून आणला असून इतर साथीदार डोंगरात पळून गेल्याचे सांगितले.
पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ थिटे, सचिन जतकर ,शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, प्रवीण गेंगजे यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या मदतीने धागेदोरे शोधत व पळून गेलेल्या आरोपींचे मोबाइल लोकेशन काढत उर्वरीत पाच जणांना 8 तासांत अटक करून चौकशी केली असता त्यांनी शिरोली येथे ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर चोरी केल्याचे आरोपींनी कबुल केले.
- रोहित्र चोरीचा तपास सुरूच
औदर (ता खेड) येथे दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरचा जनरेटर (किंमत 1 लाख 96 हजार रुपये) ची चोरी करून देहूरोड येथे विकला असल्याचे सांगितले. पोलिसांनी देहूरोड येथे जाऊन जनरेटर ताब्यात घेतला. यातील दोन आरोपी अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणारे गुन्हेगार आहेत. दरम्यान राजगुरूनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नव्या पाणी योजनेच्या चास कमान धरणाजवळील ट्रान्स्फॉर्मर (रोहित्र) चोरीचा शोध पोलिसांकडून