पुणे – एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.राज्यातील 14 साख आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. राज्यात एकूण 3595 कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. एफआरपीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल साखर आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आज साखर आयुक्तांनी साखर काखान्यांना दणका दिला आहे.
या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश –
पणगेश्वर साखर कारखाना ( लातूर ) – १३.६८ कोटी थकीत रक्कम
जयलक्ष्मी – शीला अतुल साखर कारखाना ( उस्मानाबाद ) – ७.८३ कोटी थकीत रक्कम
संत कुर्मदास साखर कारखाना ( सोलापूर ) – १२.२२ कोटी, थकीत रक्कम
त्रीधारा साखर कारखाना ( परभणी )- ३०.८२ कोटी, थकीत रक्कम
डेक्कन शुगर सागर साखर कारखाना ( यवतमाळ) – २.७५ कोटी, थकीत रक्कम
किसनवीर प्रतापगड साखर कारखाना ( सातारा) – २४.६३ कोटी, थकीत रक्कम
विठ्ठल रिफाईड साखर कारखाना ( सोलापूर ) – २६.७१ कोटी, थकीत रक्कम
जय भवानी साखर कारखाना ( बीड ) – ३०.२४ कोटी, थकीत रक्कम
रेणुका शुगर – रत्नप्रभा कारखाना ( सोलापूर ) १५.७३ कोटी, थकीत रक्कम
बबनराव शिंदे साखर कारखाना ( सोलापूर ) – १९.६० कोटी, थकीत रक्कम
जयहिंद साखर कारखाना ( सोलापूर ) – १६.२४ कोटी, थकीत रक्कम
गंगाखेड साखर कारखाना ( परभणी ) – ३२.०१ कोटी, थकीत रक्कम
योगेश्वरी साखर कारखाना ( परभणी ) – १४.८१ कोटी, थकीत रक्कम
अंबानी शुगर साखर कारखाना ( जळगाव ) – ३.८६ कोटी, थकीत रक्कम