सेहवागला लॉटरी?

मुंबई: वीरेंद्र सेहवाग हा गांगुलीच्या मर्जीतील व्यक्ती मानला जातो. एकेकाळी गांगुलीची सचिन तेंडुलकरसह सलामीची जोडी जुळली होती, त्यांनी संघाला सातत्याने सलामी दिली.

त्याचवेळी सेहवागला संघात स्थिरावण्यासाठी गांगुलीने स्वतःची जागा सेहवागला दिली आणि सचिन-सेहवाग ही जोडी सलामीला फलंदाजी करू लागली.

सेहवागला निवड समितीत स्थान देण्याबाबतचे संकेत गांगुलीकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाले आहेत.

या वृत्ताला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर देखील सेहवागला भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची लॉटरी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.