नवी दिल्ली– ओमानमध्ये होणाऱ्या लेजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व भारताचा आक्रमक सलामीवीर व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागकडे सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेत सेहवाग सहभागी होत असल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळणार आहे.
ही स्पर्धा गुरुवारपासून सुरु होणार आहे. ही टी-20 क्रिकेटलीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत इंडियन महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट या तीन संघाचा समावेश आहे.
सेहवागने यापूर्वीआयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले होते. आता तो इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे.
सेहवाग बरोबरच मंहमद कैफला इंडियन महाराजा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याचबरोबर या संघाचे प्रशिक्षक जॉन बुचनन असणार आहेत.