नवी दिल्ली – राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवड समितीची फेररचना करण्यात आली आहे. भारतीय संघाची माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग व माजी कर्णधार व हॉकीपटू सरदारा सिंग यांना समितीत स्थान देण्यात आले आहे.
देशात होत असलेल्या क्रीडा स्पर्धांमधील कामगिरीचा आढावा घेत पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी या समितीची असते. याच समितीत दिव्यांग क्रीडापटू दीपा मलिकलाही स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी देशपातळीवर एकच समिती असावी, असा ठराव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केला होता. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद आदी पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड ही समिती करेल.