#रक्षाबंधन: वाचा काय आहे सेहवागचे मजेदार रक्षाबंधन ‘अंजु-मंजू-गंजू’

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच आपल्या ‘अतरंगी’ ट्विट्समुळे चर्चेचा विषय ठरतो. सेहवागने रक्षाबंधन दिवशी देखील असेच एक मजेशीर ट्विट करत सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. सेहवागने आपल्या दोन बहिणींसोबत रक्षाबंधनाचा एक फोटो शेअर केला असून त्याने त्यासोबत मजेदार संदेश लिहिला आहे.

सेहवाग लिहितो की “रक्षाबंधनाचा एक अतूट असा बंध साजरा करताना माझ्या बहिणी अंजु, मंजू आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ ‘गंजू’.” सेहवागने या ट्विटद्वारे आपल्या डोक्यावर केस नसल्या कारणाने स्वतःला चेष्टेने ‘गंजू’ असे म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/virendersehwag/status/1033675187420573696

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)