मुंबई – मराठीतील दिग्ग्ज अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकरने अतंत्य कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिज मधील श्रियाच्या अभिनयला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सर्वच स्तरातून तिचे चांगले कौतुक देखील करण्यात आले होते.
श्रिया पिळगावकरची ओळख मिर्झापूर वेब सीरिजमुळे झाली असेल, पण याआधीही तिने शाहरुखसोबत एका चित्रपटात काम केले आहे. अभिनयासोबतच श्रियामध्ये अनेक कलागुणही दडलेले आहेत.
नुकतंच श्रियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. श्रियाला या फोटोवर संमिश्र कंमेंट्स येत आहे. फोटोमध्ये श्रियाने फ्लॉरल मोनोकिनी घातली असून त्यावर पांढरे स्पोर्ट शूज घातले आहेत. श्रियाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘Sporty Spice’ असं लिहिले आहे.
तिच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. ‘ह्यांच्याकडून महाराष्ट्राला ही अपेक्षा नाही आणि ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही…’ असं म्हणत विरोध केला आहे.
तिच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, तिने आतापर्यँत ‘फॅन’, ‘हाऊस अरेस्ट’, ‘भांगरा पा ले’ या सिनेमांमध्ये तसेच ‘मिर्झापूर’, ‘द गॉन गेम’, ‘गिल्टी माइंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘क्रॅकडाऊन’ या तिच्या काही गाजलेल्या वेब सीरिजमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.