मुंबई – महाराष्ट्रात, छत्रपती ‘शिवाजी महाराज’ यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले. त्यांचे गड किल्ले हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण सध्या महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा पाहून मराठी अभिनेता ‘हेमंत ढोमे’ यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे.
हेमंत ढोमेने आपल्या ट्विटर अकाउंटवर महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याचा ढासळलेला भागाचा फोटो शेअर केला असून, ‘महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय… #विजयदुर्गकिल्लावाचवा_अभियान’ अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय… #विजयदुर्ग_किल्ला_वाचवा_अभियान pic.twitter.com/kop3mRZErh
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) August 4, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर हेमंत ढोमे सक्रिय असून तो बऱ्याच वेळा या माध्यमातून व्यक्त होत असतो. यावेळीदेखील त्याने ट्विट केल्यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे. सध्या हेमंतचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.
राजं तुमचा मावळा शपथ घेतो…
आता तुमच्या दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिमानानं साऱ्या जगाला सांगणार… #BKMK2 #मोहीमदुर्गबांघणी #जयशिवराय#ComingSoon #शिवराज्याभिषेक pic.twitter.com/gCPY7dES4N— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) June 6, 2020
हेमंत ढोमे आपल्या आगामी ‘बघतोस काय मुजरा कर 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिमानानं साऱ्या जगाला सांगणार आहे. गेल्या दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये ‘मोहीमदुर्ग बांघणी’ असं लिहण्यात आलं आहे.