मुंबई – आपल्या अभिनयाची “एम. एस. धोनी’, “कबीर सिंग’ यासारख्या चित्रपटांतून छाप पाडणारी अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटोशूट तिनं डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी केलं आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी त्याच्या कॅलेंडरसाठी ओळखला जातो. दरवर्षी त्याच्या फोटोशूटची खूप चर्चा होते. डब्बू रत्नानीचं कॅलेंडर बऱ्याच अभिनेत्रींचं स्वप्न असतं. तसेच अनेक नवे कलाकार या कॅलेंडरसाठी फोटोशूट डेब्यू करतात.
यंदा किनारानं डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी डेब्यू केला आणि पदार्पणातच तिनं टॉपलेस फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
या फोटोमध्ये कियारा केळीच्या पानामागे टॉपलेस दिसत असून अशा प्रकारचं फोटोशूट करण्याची कियाराची ही पहिलीच वेळ आहे. या फोटोमध्ये कियारा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे.
View this post on Instagram
#Guilty. Trailer out tomorrow. @ruchinarain @apoorva1972 @karanjohar @netflix_in
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिचा गिल्टी या वेबफिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातदेखील कियाराचा अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे. यात कियाराचा आतापर्यंत न पाहिलेला असा बोल्ड अवतार पहायला मिळतो आहे. याव्यतिरिक्त कियाराच्या चित्रपटांबद्दल सांगायचं तर भूल भुलैया व इंदु की जवानी चित्रपटातही झळकणार आहे.