मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतीक्षित ‘पानिपत’ चित्रपटात बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा त्रिवेणी संगम पानिपत मध्ये प्रेक्षकांना अनुभवता आला. अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
Heartfelt Gratitude!!
Thank you Hon’ble CM @OfficeofUT ji ? for imparting TAX FREE status in our attempt of bringing the Maratha Glory to the screen through #Panipat !
@duttsanjay @arjunk26 @kritisanon #SunitaGowariker @RohitShelatkar @Shibasishsarkar pic.twitter.com/H374bAgrtk— Ashutosh Gowariker (@AshGowariker) January 9, 2020
दरम्यान, आता पानिपत चित्रपट महाराष्ट्रातील पप्रेक्षकांनी पाहावा, मराठ्यांचा इतिहास आणि पराक्रम सर्वांना कळवा यासाठी महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. ६ डिसेंबर २०१९ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वस्त दरात बघता येईल.
चित्रपटात अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊंची भूमिका अपेक्षित उंची गाठताना दिसत आहे. पार्वतीबाईंच्या भूमिकेतील क्रिती सॅनॉनला पाहताना बाजीराव मस्तानीतील काशीबाईची आठवण होते. तर संजय दत्तने उभा केलेला अब्दाली जबरदस्त आहे.