पिंपळे गुरव : फुगेवाडी येथहल जकात नाका परिसरात महापालिकेच्या मीनाताई ठाकरे शाळेच्या विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तीने बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. 25) सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान झाला. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
फुगेवाडी येथे लहान विद्यार्थ्यांना एका अज्ञात व्यक्तीने तोंडाला मास्क लावून व लाल रंगाच्या गाडीत बसण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्यामुळे लहान मुले पळत पळत शाळेत आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सर्व पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांना विचारपूस करून धारवर धरले. या वेळी स्थानिक नगसेविका स्वाती काटे यांनी पालकांशी संवाद साधला व मिटिंग घेऊन आपण येथूनपुढे असे प्रकार होणार नाहीत. तसेच फुगेवाडीतील भुयारी मार्गात सीसीटीव्ही बसवून काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी या प्रकारसंबंधी तक्रार दाखल केली आहे. याठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. नगसेवक राजू बनसोडे, युवासेनेचे विभागसंघटक नीलेश हाके, नंदू काची, संजय गरुड, अविनाश जाधव यांनी शाळेत येऊन चौकशी केली.