कलम 371 रद्द करणार नाही- केंद्रीय गृहमंत्री

इटानगर : कोणीही कलम 371 रद्द करू शकत नाही; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी म्हंटले आहे. ते आज अरुणाचल प्रदेशाच्या 34 व्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करीत होते. तसेच ईशान्य भारताच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

गृहमंत्री म्हणाले कि, कलम 370 रद्द केल्यानंतर विरोधक, कलम 371 रद्द केल्याचा दुष्प्रचार करत आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ईशान्य भारतातील परिस्थिती बदलली असल्याचे ते म्हणाले.

काय आहे 371 कलम?

कलम 371  देशातील 11 राज्यात लागू आहे. या कालमाअंतर्गत राज्यांना विशेष  दर्जा मिळतो. कलम 371 ईशान्य भारतात लागू आहे. कलम 371 ‘ए’ नागालँडसाठी कलम 371 ‘बी’ आसामसाठी कलम 371 ‘सी’ मणिपूरसाठी कलम 371 ‘एफ’ सिक्किमसाठी तर कलम 371 ‘जी’ मिझोरमसाठी लागू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.