बॉलीवूडमधील कलाकार फिटनेस आणि हेल्थबाबत किती जागरूक असतात हे वेगळं सांगायला नको. कारण बाह्यसौंदर्य तेव्हाच खुलते जेव्हा शरीर आतून तंदुरुस्त, निरोगी असते. अन्यथा मेकअपमुळे दिसणारं सौंदर्यही फार काळ तजेलदार दिसत नाही.
त्यामुळेच सर्व सेलीब्रेटी हे हेल्थ आणि फिटनेसकॉन्शस असतात. बॉलीवूडचा सदाबहार नायक अनिल कपूर तर फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असतो. फिट राहणे ही माझी गरज तर आहेच; पण त्याहून अधिक ती माझी आवड आहे. व्यायाम केला नाही तर मला विचित्र वाटतं. माझ्यासाठी फिटनेस हीच जीवनशैली आहे. ती माझी दिनचर्या आहे.
फिटनेससाठी काही तरी व्यायाम केल्याशिवाय मी कामासाठी जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी हा नियमच ठरवून घेतला आहे. मी योगा करतो, धावतो. हे केल्याशिवाय मी शूटिंगलाही जात नाही. व्यायाम चुकणारच नाही याकडे माझा कल असतो.
कारण व्यायामाशिवाय माझं डोकंच काम करत नाही, कामात माझं मन लागत नाही. अनिल कपूर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत कार्यरत आहे. नवोदित नायकांना लाजवेल असा तजेलदारपणा आजही अनिलमध्ये दिसतो. त्याचं मूळ अनिलच्या व्यायाम सातत्यामध्ये आहे !