पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसरया फेरीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या फेरीतून १८ हजार ७२६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
दुसरया फेरीतही विज्ञान शाखेतील प्रवेशाला सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय वाटप झाले आहेत. ते विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यालयात गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी त्यांचे प्रवेश नाकारण्यात येऊ नये.
हमीपत्राद्वारे त्यांना प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व पार्ट वन भरायचे बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन व पार्ट वन भरावयाची सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे
या फेरीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी १२ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. एखाद्याला प्रवेश रद्द करायचा असेल, तर संबंधित विद्यालयात विनंती करून करता येईल, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सदस्य सचिव तथा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.
दुसरया फेरीचा तपशील
शाख़ा – प्रवेशाच्या उपलब्ध जागा – अर्ज- प्रवेश जाहीर
कला – १२७६९ – ३८२६-१७५०
वाणिज्य – २९३०६ – १७७४९ – ७२७८
विज्ञान – २८०२३-२७६४०-९३९८
एचएसव्हीसी – २७१६ – ६३३
एकूण – ७२८१४ – ४९८४८-१८७२६