पीएमबीच्या दुसऱ्या खातेदाराचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या बॅंकेत ठेवी ठेवणारे 59 वर्षीय फत्तोमल पंजाबी यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. गेल्या 24 तासात घडलेली ही दुसरी घटना आहे.

पंजाबी हे मुलुंड येथील रहिवासी होते. त्यांचे हार्डवेअर आणि इलेक्‍ट्रिकल वस्तूंचे दुकान आहे.सोमावारी 51 वर्षीय संजय गुलाटी यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी या बॅंकेत 90 लाख रुपयाच्या ठेवी ठेवल्या होत्या. बॅंकेच्याविरोधात झालेल्या निदर्शनात ते सहभागी झाले होते.

या बॅंकेतून ठेवी काढण्यास आरबीआयने निर्बंध घातले आहेत. 40 हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. त्यामुळे 77 टक्के ग्राहकांचा सर्व निधी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.