झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

दिग्गजांचे भवितव्य पणाला

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकांतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत असून 260 उमेदवारांचे भवितव्य आज पणाला लागले आहे. त्यांच्या भविष्याचा फैसला मतदार आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद करणार आहेत.


राज्यातील 81 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 65 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत.


राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून, 30 नोव्हेंबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. येथील मतदानाचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण, आदिवासीबहुल भागातील अनुसूचित जातींसाठी 20 पैकी 16 मतदारसंघ आरक्षित आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री रघुवर दास, विधानसभा अध्यक्ष दिनेश उराव आणि भाजपा अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांसारखे दिग्गज मैदानात आहेत.

दुसऱ्या टप्प्यात बहरागोड़ा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपुर पूर्व, जमशेदपुर पश्‍चिम, सरायकेला, चाईबासा, मंझगांव, जगन्नाथपुर, मनोहरपुर, चक्रधरपुर, खरसावां, तमाड़, तोरपा, खूंटी, मांडर, सिसई, सिमडेगा आणि कोलेबिरा या मतदारसंघात मतदान होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.