झारगडवाडीत 15 एकर ऊस खाक

बारामती तालुक्यात दोन दिवसात दुसरी घटना

 डोर्लेवाडी– बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे काल दहा शेतकऱ्यांचा तब्बल 15 एकर शेतातील ऊसाला अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत सुमारे 15 एकर ऊस आणि त्यातील 12 एकर उसातील ठिबक सिंचन जळून खाक झाले. दोन दिवसांत बारामती तालुक्यातील ऊसाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सध्या हतबल झाले आहेत. आग लागल्याचे समजात साळुंके, निकम, बोरकर, झारगड यांनी शेताकडे धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाला देखील घटनेची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामध्ये संपूर्ण ऊस खाक झाला होता.
या घटनेत एकरी अडीच लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. यात दहा शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी कारखान्याचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती, आगीचं कारण अद्याप समजू शकले नाही.

आमच्या उसाला अचानक आग लागली या आगीत जवळपास पंधरा एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहे यात बारा एकर क्षेत्रातील ठिबक सिंचन जळून खाक झाले आहे यामुळे ठिबक सिंचन सह उसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावे, असं जळीतग्रस्त शेतकरी बाळासाहेब निकम, धुळाबापू बोरकर यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.