पुणे : गुरुवारी पुण्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा दोनवर पोहचला आहे. ३० मार्चला पुण्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता.
या कोरोनाबाधित महिलेला १ एप्रिल रोजी पुण्याच्या ससून रुग्नालयात दाखल करण्यात आलं होत. त्यावेळी सदरील महिलेला निमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सदरील महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. गुरुवारी नमुन्याचा अहवाल आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
ससून रुग्नालयात उपचार सुरु असतानाच तिच्या सायंकाळी मृत्यू झाला . दरम्यान महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले