IND Vs SA 2nd TEST : विराटची डबल सेंच्युरी , भारताच्या ४ बाद ४९५ धावा

पुणे – भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावत भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात यश मिळवल आहे. विराटला उपकर्णधार अजिंक्यने चांगली साथ दिली. सध्या भारताचा ४ बाद ४९५ धावांवर खेळ सुरू आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्मा लवकरच माघारी परतल्यानंतर, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी दोन्ही फलंदाजांनी १३८ धावांची भागीदारी केली. कगिसो रबाडाने चेतेश्वर पुजाराला बाद करत ही जोडी फोडली. मयांकने १९५ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १०८ धावा रचल्या.

मयंक बाद झाल्यावर, राट आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवसाअखेर भारताला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. दोघांनी नाबाद १४७ चेंडूत ७५ धावांची नाबाद भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघाने ८५.१ षटकात ३ बाद २७३ धावा केल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.