महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा 2019 – क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 7 गडी राखून पराभव
पुणे – साखळी फेरीत राहुल देसाईने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनायटेड क्रिकेट क्लब संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे सुरु आहेत. प्रथम फलंदाजी करताना युनायटेड क्रिकेट क्लबच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 38.3 षटकांत 188 धावावर संपुष्टात आला.
देव डी.(40धावा) व युवराज झगडे (35धावा) या सलामीच्या जोडीने 67 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. पण सलामीची जोडी बाद झाल्यानंतर यश क्षीरसागरच्या 39 धावा व सुरज शिंदेच्या 39 धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. युनायटेड क्रिकेट क्लबकडून राहुल देसाई (4-29), अद्वैय शिधये(3-67), आकाश बेनाली (1-23)यांनी अचूक गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
188 धावांचे आव्हान युनायटेड क्रिकेट क्लब संघाने 26.1 षटकांत 3 बाद 194 धावा करून पूर्ण केले. यात रोहित करंजकर 32, अद्वैय शिधये 26, अमेय सोमण 13 हे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर राहुल देसाईने 49 चेंडूत 4 चौकार व 9 षटकारासह नाबाद 85 धावा, तर अजित गव्हाणेने 26 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 33 धावा करून संघाचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या गडयासाठी 37 चेंडुत 51 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी राहुल देसाई ठरला.
सविस्तर निकाल: साखळी फेरी:
क्लब ऑफ महाराष्ट्र : 38.3 षटकांत सर्वबाद 188धावा (देव डी. 40(52,6चौकार, 1षटकार), युवराज झगडे 35(55,5चौकार), यश क्षीरसागर 39(44, 5चौकार), सुरज शिंदे 39(18, 2चौकार, 4षटकार), राहुल देसाई 4-29, अद्वैय शिधये 3-67, आकाश बेनाली 1-23).
युनायटेड क्रिकेट क्लब : 26.1 षटकांत 3 बाद 194 धावा (राहुल देसाई नाबाद 85(49, 4चौकार, 9षटकार), अजित गव्हाणे नाबाद 33 (26,3 चौकार,2 षटकार), रोहित करंजकर 32 (36), अद्वैय शिधये 26(34), अमेय सोमण 13(12), सय्यद जमाल 1-27); सामनावीर- राहुल देसाई.