मुकेश अंबानींना सेबीकडून ‘मोठा झटका’; रिलायन्सला 25 तर मुकेश अंबानींना 15 कोटींचा दंड

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबांनी यांना २०२१ च्या सुरुवातीला काही मोठे धक्के बसत आहेत. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांची घसरण झाल्यानंतर आता सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरईएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 25 कोटी, कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 15 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय नवी मुंबई एसईझेड प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी आणि मुंबई एसईझेड लिमिटेडला 10 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नोव्हेंबर 2007 मधील शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुकेश अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजला दंड ठोठावला आहे.

मार्च 2007 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे 4.1 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर आरपीएलचे आरआयएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी सेबीचे अधिकारी बी.जे.दिलीप यांनी 95 पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे.

गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला. रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर 2007 मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने ही दंडात्मक कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.